लिखाण
खुपदा काहीतरी लिहाव वाटत
आपणच आपल कुणीतरी व्हावं वाटत
मग मस्त लेखणी अन कागद पुढ्यात घेऊन बसतो
पण काही सुचतच नाही...
मग मी त्यामागच कारण शोधू लागतो..
लक्षात येत
इथे तर आठवणींनाच स्मृतिभ्रंश झालाय...
आता यावर मार्ग कसा काढायचा असा प्रश्न उभा राहतो...
उत्तारा दाखल जेव्हा मग मी माझे शब्द शोधू पाहतो..
तेव्हा साले शब्दच रुसून बसतात...
शब्दांना मनावण्याचा मी तेव्हा आटोकाट प्रयत्न करतो..
पण तो नेहेमीसारखा व्यर्थच ठरतो...
जाऊदे, म्हणून जेव्हा मी नाद सोडतो ...
कसा कुणास ठाऊक,
साला नकळत कागद भरतो....
- नि. सु. देशमुख
Comments
Post a Comment