सैनिक मित्रा तुझ्या साठी…

राहतो सुखात मी
तू  हाड…

हसतो रोज मी
तू रड…

लढतो मी पण
तू गप तग धर…

''खातो'' मी तुज्यावाटच
तू उपवास धर…

झोपतो मी निवांत
तू जागरण कर…

काय म्हणतोस ?? अस का???

काय सांगू "मित्रा" तुला खूप त्रास होतोय
विरोधकांच्या हाती रोज एक नवीन मुद्दा येतोय….

एक एक एक एक निस्तरताना अगदी जीव जातोय
सध्या रोज पुन्हा पुन्हा "१४"चीच स्वप्न पाहतोय…

पण तू काळजी करू नकोस तुझ्यावरही लक्ष आहे
तुझ्या नंतर घरच्यांना द्यायला "५ लाख" काढून ठेवलेत

"हीच तुझी किंमत आहे"
"तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे"


- तुझाच प्रिय "राजकारणी"

Comments

Popular posts from this blog

पावसाळी प्रकाश

जलचक्र

तो धावत होता जीव मुठीत घेऊन