पाउस कसा पडतो ??
पाउस कसा पडतो ??
जलचक्र तस शाळेत असतानाच शिकून झाल पण ह्याच जलचक्राला आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर ???
समजा.....
आपल मन म्हणजे अथांग सागर..... भावनांनी भरलेला...
सगळ अगदी निमुटपणे सामावून घेणारा....
दिवसा नाती जपायला आपल्या भावनांना आत ठेवून ओहोटी आणणारा..
आणि रात्रीच्या सुखावणार्या मंद चंद्रप्रकाशात त्याच भावनांची भरती झेलणारा..
सगळ अगदी निमुटपणे सामावून घेणारा....
दिवसा नाती जपायला आपल्या भावनांना आत ठेवून ओहोटी आणणारा..
आणि रात्रीच्या सुखावणार्या मंद चंद्रप्रकाशात त्याच भावनांची भरती झेलणारा..
नद्या म्हणजे आप्तेष्ट, या सागराला जिवंत ठेवणारे...
या सागरात वेगवेगळ्या भावना पोहोचवणारे...
या सागरात वेगवेगळ्या भावना पोहोचवणारे...
लक्ख सूर्यप्रकाश, म्हणजे आपली परीक्षा पाहणारे प्रसंग...
भावनांना एक एक करून नकळत मारणारे...
भावनांना एक एक करून नकळत मारणारे...
याच भावनांची मग हलकी वाफ होते अन ती वाफ रोजच्या त्याच रटाळ दिवसात कुठे तरी हरवून जाते...
इथे नेहेमीची तीच हवा म्हणजे रोजचा तोच दिवस बर....
इथे नेहेमीची तीच हवा म्हणजे रोजचा तोच दिवस बर....
नकळत वाफ हवेत विरून जाते , पण थोडी थोडी करून तिचे कुठेतरी ढग तयार होत असतात...
असे बरेच ढग मग वातावरणात तयार होऊ लागतात..
काही दिवसातच काळ्या कुट्ट ढगांची जत्राच भरते आभाळात...
काही दिवसातच काळ्या कुट्ट ढगांची जत्राच भरते आभाळात...
सगळीकडे काळोख दाटतो...
सूर्यप्रकाश कुठेच दिसत नाही अन वातावरणात एक वेगळाच ओलावा पसरतो..
सूर्यप्रकाश कुठेच दिसत नाही अन वातावरणात एक वेगळाच ओलावा पसरतो..
भावनेच्या ह्या ढगांमध्ये घर्षण होते न एकाच गडगडाट होतो...
थरकाप उडवणारा.....
तेव्हा सुखावणारा गार वारा थंड करतो या ढगांना...
हा वारा प्रत्येकाच्या जीवनात वेग वेगळा असू शकतो.. आई, बाबा, मित्र अगदी कोणीही...
हा वारा प्रत्येकाच्या जीवनात वेग वेगळा असू शकतो.. आई, बाबा, मित्र अगदी कोणीही...
त्या सुखावणार्या सहवासात मग ढगांना त्यात साचलेल्या पाण्याच (भावनांचं) ओझ पेलवेना होत...
आणि..........
पाउस पडतो
- नि. सु. देशमुख
Comments
Post a Comment