"देव"
आज न राहवून लिहावास वाटतंय… विषय थोडा जुनाच - "देव"
खरतर मी काही खूप मोठा नाही या विषयावर बोलायला पण मला आजवर न सुटलेला न उमजलेला हा प्रश्न.
हा देव म्हणजे आहे तरी कोण? हा प्रश्न आज परत पडण्याच कारण - नुकताच सत्यनारायण पूजेला बसण्याचा योग आला….
एक कुणी विशीतला तरुण, ज्याला साठीतले लोक "गुरुजी" संबोधत होते, पूजा सांगत होता… यावेळी यजमान असल्याने पूजा ऐकण मला भागच होत, मानून मला कलाल कि यात गोष्टी असतात
म्हणल चला "कथा" ऐकुयात. कथा ऐकताना अस लक्षात आल कि "सत्यनारायण" भगवान फारच दयाळू आहेत, ते भक्तांची सगळी गार्हाणी ऐकतात, त्यांना सुख समृद्धही देतात पण…… अटी लागू…. भक्ताला सुख समृद्धी हवी असेल तर त्याने पूजा अर्चा करावी, नुसती भक्ती असून चालणार नाही ; नवस बोलला कि तुम्हाला सर्व काही मिळेल पण जर तो नवस पूर्ण केला नाहीत ( लाच दिली नाहीत) तर त्याचा कोपही होतो आणि तो तुमच्याकडील त्याने दिलेली सुख-संपत्ती सर्व परत नेतो… (हे ऐकून नक्कीच भीती वाटली पण मग पूजा चालू असताना गुरुजींनी दोन वेळा फोन उचलुन मित्रांना कुठे भेटायचं नि कस कुठे जायचं ते सांगितलं तेव्हा देवाला याचा पण राग येईल का? असा मला प्रश्न पडला).
त्या कथेत कोणी एक स्त्री तिच्या नवर्याच्या समृद्धही साठी हीच पूजा करते, पूजा पूर्ण होते अगदी विधिवत. तो जेव्हा परतीच्या वाटेवर आहे अस तिला कळते तेव्हा त्याच्या भेटीला व्याकुळ झालेली ती न राहवून त्याला भेटायला म्हणून निघते; त्याच्या ओढीने…. पण अहो दुर्भाग्य, त्याची नाव पाण्यात बुडते, याला कारण कथेत पुढे सांगितले आहे - तिने पूजा तर केली पण ती "प्रसाद" ग्रहण न करताच त्याच्या भेटीला गेली: त्याचेच हे फळ होते… मग तीने परत जाऊन देवाची माफी मागून प्रसाद ग्रहण केला आणि काय चमत्कार, देव "पावला" आणि तिचा पती तिला परत मिळाला, देवाच्या कृपेने….
हा देव म्हणजे आहे तरी कोण? हा प्रश्न आज परत पडण्याच कारण - नुकताच सत्यनारायण पूजेला बसण्याचा योग आला….
एक कुणी विशीतला तरुण, ज्याला साठीतले लोक "गुरुजी" संबोधत होते, पूजा सांगत होता… यावेळी यजमान असल्याने पूजा ऐकण मला भागच होत, मानून मला कलाल कि यात गोष्टी असतात
त्या कथेत कोणी एक स्त्री तिच्या नवर्याच्या समृद्धही साठी हीच पूजा करते, पूजा पूर्ण होते अगदी विधिवत. तो जेव्हा परतीच्या वाटेवर आहे अस तिला कळते तेव्हा त्याच्या भेटीला व्याकुळ झालेली ती न राहवून त्याला भेटायला म्हणून निघते; त्याच्या ओढीने…. पण अहो दुर्भाग्य, त्याची नाव पाण्यात बुडते, याला कारण कथेत पुढे सांगितले आहे - तिने पूजा तर केली पण ती "प्रसाद" ग्रहण न करताच त्याच्या भेटीला गेली: त्याचेच हे फळ होते… मग तीने परत जाऊन देवाची माफी मागून प्रसाद ग्रहण केला आणि काय चमत्कार, देव "पावला" आणि तिचा पती तिला परत मिळाला, देवाच्या कृपेने….
खरच देव असा आहे का? मतलबी आहे का तो कि स्वार्थी आहे? फक्त प्रसाद खाल्ला नाही म्हणून तो कोणाच्या पतीला अस घेऊन जाऊ शकतो?? आणि असेल तर त्या देवाची मी पूजा का करू ????
मग जो माणूस निस्वार्थी पने दुसर्यांवर प्रेम करतो, न मागता सर्व काही देतो, सर्वांना देतो त्याला आपण "देव माणूस" का म्हणतो? देव उपवास करायला सांगतो का? हो तर असे का? गायी च्या पोटात ३३ कोटी देव असतात अस मी ऐकलय मग यात सगळ्यात श्रेष्ठ देव कोणता? देव जर असेल तर त्याची इतकी सारी रूप का आहेत? हे देव कोणी पाहिले होते? देव्हार्यातल्या फोटोंमध्ये जे देव आहेत त्यांनी ग्रफ़र ला विशेष दर्शन दिल होत कि त्यानेही त्यासाठी "तप" केला होता? केला होता तर किती नि कसा कारण हे सगळे प्रश्न मला देवालाही विचारायचे आहेत……
माझी देवावर श्रद्धा आहे, मीही त्याच्या चरणी हात जोडतो पण आहे त्या जागेवरून, त्यापर्यंत तो पोहोचत असेल अस गृहीत धरुनच… जेव्हा मला एकात वाटत, मी त्याच्याशी बोलतोही, तोही माज्याशी सल्ला मसलत करतो, अगदी जिवलग मित्रासारखा…
माझ्यासाठी देव हि एक खास जागा आहे, एक universal अशी जागा, बाप्पा, अल्लाह, येशु इत्यादी हि त्याची लेकरे… मी माझ्या सोयी प्रमाणे त्या सर्वांच्या ठायी नतमस्तक होतो, या गोष्टीचा त्याला राग तर नसेल न येत? मी अस करतो म्हणून मी बंडखोर आहे अस त्याच माझ्याबद्दल मत झाल तर नसेल ना? मी त्याला नमस्कार करत नाही पण मंदिरासमोरून जाताना "चाल बाप्पा येऊ का रे?? " अस न चुकता विचारतो ह्याबद्दल देव मला शिक्षा करेल का? अस केल्याने मला तो जास्त जवळचा वाटतो यात माझ काही चुकतंय का? हो तर मग तस तो मला दृष्टांत देऊन सांगत का नाही?
मी नेहेमीच त्याच्याकडे "माझी लायकी असेल तितकच दे, बाकी सगळ मी मिळवतो" अस मागण मागतो, हे मागण पूर्ण करण्यासाठी मला नवस बोलावा लागेल का? हो तर तो कसा नि काय? नि सगळ्यात महत्वाच "का"????
डोक्यात प्रश्नांनी नुसता काहूर माजलाय। "देवा - तूच वाचाव रे आता मला"

Comments
Post a Comment