मी कोण? कोण मी?
दिल्लीतल्या घटनेनी मन हेलावल. अश्या घटना घडत आल्या आणि घडत राहणार, या देशच काय होणार? काही खर नाही या देशच. या सगळ्याला राजकारणच जबाबदार आहे, सरकार कमजोर आहे. सोडा रे आपल्याला काय करायचं? हि वाक्य आपल्यातला प्रत्येक जण केव्हा न केव्हा तरी बोलतोच, मित्रांनो बोलण्या आधी एकदा आत डोकावून बघा आणि विचार स्वतःला कि "मी कोण?"
मी कोण? कोण मी?
एक जाणता? कि अजाण जनता?
एक सुद्न्य पालक? कि अज्ञान बालक?
मी कोण? कोण मी?
झालगेल विसरणारा षंढ? कि फक्त बडबडणारा थंड?
अत्याचार सहन करणारा ? कि करणारा?
कि समोरच्याची दुख्ख पाहून नुसताच हुरहुरणारा?
कि गुन्हेगारांच्या जगात वावरणारा एक सज्जन?
सज्जन? खरचं?
मी कोण? कोण मी?
इतरांचं दुख्ख बघून कळवळणारा? कि मी एकटाच दुख्खी म्हणून रडणारा?
कि घरात बसून बसून सडणारा?
जगभरातल्या घडामोडी रोज बघणारा? कि छोट्या मोठ्या का होई न पण समस्या सोडवणारा?
येईल त्या संकटाला बेधडक नडणारा? कि हरम्यांच्या सेनेत अजून एक घडणारा?
मी कोण? कोण मी?
पडणारा? कि पाडणारा?
कि सर्वांना एकत्र जोडणारा?
अन्यायाविरुद्ध लढणारा? कि 'मीच का?' म्हणून विषयच सोडणारा?
मी कोण? कोण मी?
दुसऱ्यावर हसणारा? कि त्याला हसवणारा?
कि काटेरी शब्दांनी त्याच जग हलवणारा?
परिणामांची फिकीर न करता वाट्टेल ते बोलणारा?
कि इतरांसाठी आनंदाची नवनवी दारं खोलणारा?
मी कोण? कोण मी?
माझ्याच धुंदीत डोलणारा? वाट्टेल ते बोलणारा?
कि दुख्खी जणांची दुख्ख अलगद झेलणारा?
अमर्याद संकट निष्णातपणे पेलणारा?
कि जखमेवरची खपली निर्दायीने सोलणारा?
मी कोण? कोण मी?
अंध? डोळस? मूक बधिर? अपंग?
या रंगीत जगात बेरंग?
असंगाशी संग कि बेडौल अंग? कि कापड तंग?
कि आपापल्यातच मांडलेली जंग?
मी कोण? कोण मी?
तरुण? वयस्क? वृद्ध?
कि शुध्धीतही हरवलेली शुध्द?
शुद्ध? कि अशुद्ध?
कि आंतरजातीय/ धर्माधार्मातल युद्ध?
मी कोण? कोण मी?
सबला? कि अबला?
पुरुष कि स्त्री वर आलेली बला?
मुलगा मुलगीतला भेदभाव कि हुंड्याची न संपणारी हाव?
कि नियतीने मांडलेला न उलगडणारा डाव????
मी कोण? कोण मी?
एक अक्षय निर्धार? कि सामन्या आधीच मानलेली हार?
कि म्यान केलेली दुधारी तलवार?
प्रकाश? कि अंधार? कि बुडत्याचाचा आधार?
दुष्टांचा संहार कि नैतिकतेवर केलेला प्रहार?
काय म्हणता? कळत नाहीये? कि कशाचा कशाशी संदर्भ जुळत नाहीये?
नीट वाचा. विचार करा. संदर्भ लावा. प्रश्न विचार "स्वतःला"
मी कोण? कोण मी?
मी यातलाच कोणी एक तर नाही???
- निखिल सु. देशमुख.
Comments
Post a Comment